सरावादरम्यान यमुना नदीत लष्कराची बोट उलटली, दोन जवान बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरावादरम्यान यमुना नदीत बुधवारी लष्कराची बोट उलटली. या दुर्घटनेत लष्कराचे दोन बेपत्ता झाले आहेत. हरियाणा-हिमाचल सीमेवरील हथिनी कुंड बॅरेजजवळ ही घटना घडली. पूरपरिस्थितीत बचावकार्याचा सराव करत असताना, लष्कराची बोट धोक्याच्या क्षेत्रात गेली आणि पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने ती उलटून बुडाली.

घनटेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस आणि एसडीआरएफची (SDRF) पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी नदीत शोधमोहीम सुरू केली. काही जवान पोहून सुरक्षित बाहेर पडल्याचे समजते, तर बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे, असे इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे तीन जवान सुमारे 600 मीटर अंतर पोहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “1 पॅरा स्पेशल फोर्सचे जवान हथिनी कुंड बॅरेज परिसरात सराव करत होते. त्यावेळी लष्कराच्या बोटीला अपघात झाल्याची माहिती मिळाली. यात दोन जवान बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि बाधित जवानांची एकूण संख्या याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.