प्रभादेवीत शुक्रवारी ‘शब्द सुरांची मैफिल’, अशोक पत्की यांच्या गाजलेल्या गीतांची पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित ‘शब्द सुरांची मैफिल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरात होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून होणाऱया या कार्यक्रमाला अशोक सराफ, निवेदिता सराफ, साधना सरगम, स्वप्निल बांदोडकर उपस्थिती राहणार आहे. धनंजय म्हसकर, अनघा पेंडसे, प्राजक्ता सातार्डेकर, अभिषेक नलावडे गाणी सादर करणार असून मयूरेश साने निवेदन करणार आहेत. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका 3 सप्टेंबरपासून नाटय़गृहावर उपलब्ध असतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. मायबोली कलामंच व मराठी संवर्धन मंडळ कार्यक्रमाचे आयोजक आहेत.