
एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांना डेपोत तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. या समस्येची दखल घेऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल शहर शाखेच्या वतीने ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ४०० ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि नोकरदारांनी लाभ घेतला.
शिवसेनेचे विभागप्रमुख यतिन देशमुख यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, महिला यांच्यासह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तांत्रिक पथकाच्या मदतीने तब्बल ४०० नागरिकांची अर्ज प्रक्रिया व नोंदणी पूर्ण करण्यात आली.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विभागप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, धनंजय पाटील, शहर संघटक मालती पिंगळा, प्रभागप्रमुख बिपीन झुरे, जयंत पाखरे, प्रशांत नरसाळे, विकास पोवळे, शाखाप्रमुख गोविंद जोग, मृण्मय काणे, संदेश बन्ने, प्रवीण चोणकर, निखिल कांबळे, ओमकार धावडे, सीन डिसुझा तसेच महिला आघाडीच्या वैशाली थळी, अर्चना पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
डिजिटल व्यवहार
सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे आणि त्यांना प्रशासकीय सुविधा सहज उपलब्ध करून देणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाप्रमुख निकम यांनी सांगितले. एसटी स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना एसटी बस प्रवासादरम्यान रोख रकमेऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवास करता येणार आहे.





























































