खुशखबर! जेन झी होणार मतदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व्होटर हेल्पलाइन ऍपमध्ये जन्मतारखेच्या रकान्याने आता 2006 वरून 2008वर उडी मारल्यामुळे तरुणांचा मतदार नोंदणी मार्ग मोकळा झाला आहे. या ऍपमधील जन्मतारखेचा रकाना 1 ऑक्टोबर 2006च्या पुढे सरकत नव्हता. हा रकाना थेट 30 सप्टेंबर 2008पर्यंत पुढे ढकलल्याने जेन झींची मतदार नोंदणी हेणार आहे.