युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न हवेत; मोदी-पुतिन यांचे शेकहॅण्ड, गळाभेट आणि चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. कधीही न संपणाऱ्या युद्धापासून लांब होऊन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शांततेच्या दिशेने करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांचे हिंदुस्थान समर्थन करतो, असे मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी हे किर्गिस्तानची राजधानी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बिश्केक येथे दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांची आणि पुतिन यांची भेट झाली. मोदींनी पुतिन यांना हिंदुस्थानात होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.