
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर गौतम अदानी यांनी 10 लाख रुपयांची मिठाई वाटली होती, असा गौप्यस्फोट पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बंगालमधील उद्योग व गुंतवणुकीवर बोलताना त्यांनी भाजप आणि अदानी यांच्यातील संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. ‘बंगालच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गौतम अदानी यांनी मला फोन केला. ते खूप आनंदात होते. देश वाचवल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. मी काल 10 लाख रुपयांची मिठाई वाटली’ असे ते म्हणाल्याचे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. गौतम अदानी यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत, असेही ते म्हणाले. सुवेंदू यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात भाजपच्या अदानी प्रेमाची चर्चा रंगली आहे.




























































