
ज्या उझबेकिस्तानातून बाबर हिंदुस्थानात आला होता, त्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे. तुम्ही बाबरच्या नावाने शिव्या-शाप देता. तरीही त्याच देशाचे लोक तुम्हाला पुरस्काराने सन्मानित करत आहेत आणि तो सन्मानही तुम्ही स्वीकारला. खरंच भाजप अभिनंदनास पात्र आहे, अशा खोचक शब्दांमध्ये ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष-खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोदी यांना ‘ओली दाराजली दस्तलिक’ या पुरस्काराने उझबेकिस्तानने सन्मानित केले. त्यावरून ओवेसींनी टीकास्त्र सोडले.





























































