बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; 5 प्रवाशांचा मृत्यू, 20 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहने उलटली. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात बडवार येथे बुधवारी संध्याकाळी हा अपघात घडला.

टीव्ही 9 भारतवर्ष दिलेल्या वृत्तानुसार, प्रवासी बस रेवाहून सिधीकडे जात असताना बडवारजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या धडकेनंतर दोन्ही वाहने उलटली. अपघातामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून अपघातग्रस्त वाहनांमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम केले. जखमींना रुग्णवाहिका आणि इतर वाहनांच्या साहाय्याने रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात नेण्यात आले.