भाविकांची बस डिव्हायडरला धडकून उलटली; 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाविकांना घेऊन जाणारी बस डिव्हायडरला धडकून उलटल्याने 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर बडागाव कटजवळ रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. ही बस राजस्थानमधील बांगर येथून परतत होती.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानहून बदायूकडे भाविकांना घेऊन बस जात होती. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बस डिव्हायडरला धडकून उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचाव कार्य सुरू केले. बसमध्ये 32 प्रवासी होते. अपघातात अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमीं प्रवाशांना उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटर व जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.