Ratnagiri News – वनविभागाच्या सतर्कतेमुळे अजगराला मिळाले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाभोळे बाजारपेठ येथील मुस्लिम मोहल्ला परिसरात एका नागरिकाच्या घराजवळ मोठा अजगर आढळल्याची घटना घडली. शरीफ साटवीलकर यांच्या घराशेजारी सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातील महिलेला हा अजगर निदर्शनास आला. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे शेजारील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी जमा झाले.

अजगर सुरक्षित ठिकाणी राहावा आणि तो इतरत्र निघून जाऊ नये म्हणून अब्दुल लांजेकर व इतर ग्रामस्थांनी जवळपास दोन तास त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून होते. दरम्यान ग्रामीण वार्ताचे पत्रकार सिकंदर फरास यांनी या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वरचे वनपाल सागर गोसावी यांनी दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांना तात्काळ सूचना दिल्या. त्यानुसार डॉ. प्रितेश आडव आणि सहाय्यक सुयोग भेरे घटनास्थळी दाखल झाले.

वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने अजगराला सुरक्षितपणे पकडले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या कार्यवाहीमुळे एक मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी आणि घरातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.