
क्वालालंपूरहून चेन्नईला जाणाऱ्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाचे हवेतच दुसरे इंजिन निकामी झाले. यानंतर विमानाचे चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंगनंतर प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दिल्ली आणि चेन्नई येथील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियन एअरलाईन्सचे MH 0156 हे विमान क्वालालंपूरहून चेन्नईला येत होते. विमानात 186 प्रवासी होते. या विमानाचे हवेत असताना दुसरे इंजिन निकामी झाले. तांत्रिक बिघाडानंतर पायलटने तात्काळ चेन्नई विमानतळाशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंग केले.
चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंगच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सीआयएसएफ (CISF) पथके सज्ज ठेवण्यात आली होती. पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान सुरक्षितपणे उतरवले. पायलटच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळेवर दिलेल्या माहितीमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

























































