
मेक्सिकोमध्ये धार्मिक उत्सवादरम्यान फटाक्यांच्या सामानात जोरदार स्फोट झाल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्फोटानंतर आग पसरली आणि चर्चच्या भिंतींचा एक भागही कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात टेमास्कालसिंगो नगरपालिकेच्या सांता मारिया कांचेस्दा गावात झाला.
























































