सबालेंकाची आगेकूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज गतविजेत्या खेळाडूंनी आपापल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत यूएस ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. या चॅम्पियन्स खेळाडूंचा फॉर्म पाहता यूएस ओपनच्या जेतेपदासाठी पुन्हा एकदा सबालेंका व अल्काराज यांच्यापैकी कोण लढतोय याकडे तमाम टेनिसपटूंच्या नजरा असतील.

अव्वल मानांकित बेलारूसच्या सबालेंकाने अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडचा 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला, तर स्पेनच्या अल्काराजनेही टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव करत आगेकूच केली. सबालेंकाने यूएस ओपनमध्ये सलग सहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता तिची लढत विद्यमान विम्बल्डन विजेत्या झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हाशी होणार आहे. नोस्कोव्हाने युक्रेनच्या मार्ता कोस्तियुकचा तीन सेटमध्ये पराभव करत प्रथमच यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, उजव्या मनगटाच्या दुखापतीनंतर तब्बल साडेचार महिन्यांनी कोर्टवर परतलेल्या कार्लोस अल्काराजने टॉमी पॉलला नमवले.