
गरोदर महिलेला आरोग्य केंद्रात घेऊन जाणारी रुग्णवाहिका खड्ड्यात अडकल्याची घटना आग्य्राच्या बाह परिसरातून उघडकीस आली. त्यामुळे तब्बल दोन तास मातेला प्रसूती कळा सोसाव्या लागल्या. अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून ही रुग्णवाहिका बाहेर काढण्यात आली. मात्र या घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाला. उपचाराला विलंब झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला.
रुग्णवाहिका निघाली, मात्र घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या 10 फूट लांब, तीन फूट रुंद आणि दोन फूट खोल खड्ड्यात ती अडकली. अखेर ग्रामस्थ पुढे सरसावले आणि त्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णवाहिका बाहेर काढली. यानंतर कुटुंबीयांनी मातेला जवळच्या खासगी रुग्णालयात तिची प्रसूती झाली. मात्र, बाळ मृतावस्थेत जन्माला आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.


























































