गुजरातच्या कंत्राटदाराला पालिकेच्या ‘आयटी’चा ठेका! कोट्यवधींचा निविदा घोटाळा झाल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या आयटी विभागातील ‘गुजरातप्रेमा’चा पर्दाफाश झाला आहे. पालिकेच्या आयटी विभागातील जवळपास 122 कोटींची सुरक्षा साधनांची निविदा गुजरातच्या पंपनीला दिल्याचे समोर आले आहे. पूर्वी 1,600 रुपयांना घेतलेले अॅण्टी-व्हायरस गुजरातच्या ठेकेदार पंपनीकडून चक्क सहा हजार रुपयांना घेतले आहे. यात कोटय़वधी रुपयांचा निविदा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे.

दौंडकर यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त आणि मुख्य दक्षता अधिकाऱयांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दौंडकर यांनी 2016 मधील ‘सॅप हाना’ निविदा प्रक्रियेशी संबंधित गंभीर आरोप केला आहे. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) राजेंद्र फणसे यांनी बॅकएंड प्रणालीद्वारे गोपनीय निविदा किमतीची माहिती अयोग्य पद्धतीने मिळवून ती ‘एम/एस एबीएम’ पंपनीला पुरविल्याचा संशय आहे. या प्रकरणी ‘टेक महिंद्रा’ पंपनीने ऑडिटची मागणी केली होती. त्यावर ते सिस्टीम लॉग्सच (डेटा रेकॉर्ड) बाहेरील कर्मचाऱयाच्या लॉगिनचा वापर करून डिलीट केले. नंतर त्या कर्मचाऱयाला सेवेतून काढून पुरावे नष्ट करण्यात आल्याचा दावा दौंडकर यांनी केला आहे.

क्लाऊड कराराबाबत आक्षेप

गुजरातच्या ‘एम/एस ब्लॅकबॉक्स’ पंपनीला देण्यात आलेली निविदा फणसे यांनी हाताळली आहे. 2016 च्या क्लाऊड कराराबाबत स्थानिक लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप घेण्यात आले होते.

तीन अधिकाऱयांवर गंभीर आरोप

तक्रारदार दौंडकर यांनी राजेंद्र फणसे, मिनल शेटये आणि डेनिस फर्नांडिस या तीन अधिकाऱयांच्या दीर्घकालीन नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.