ओबीसींना ‘ओपन’मध्ये टाकण्याचे मोदी सरकारचे कारस्थान, नाना पटोले यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची फसवणूक करत असून ओबीसींना खुल्या प्रवर्गात (ओपन) टाकण्याचे मोदी सरकारचे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज केला.

नाना पटोले यांनी आज राजभवन येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन राज्यातील विविध महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे त्यांचे लक्ष वेधले. त्या भेटीनंतर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देशातील ओबीसींवर मोदी सरकार अन्याय करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, देशामध्ये 4,200 पेक्षा जास्त ओबीसी जाती आहेत. सरकारने आणि स्वतः पंतप्रधान मोदींनी देशात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले जात नाही. जनगणनेसाठी जे 40 प्रश्न तयार करण्यात आले आहेत, त्यातील 10 नंबरच्या प्रश्नातून असे स्पष्ट दिसते की, ओबीसींना थेट ‘ओपन’मध्ये टाकण्याचाच सरकारचा मानस आहे, असे पटोले म्हणाले.