
काँगोमधील दोन शाळांना लागलेल्या भीषण आगीत 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 19 मुली आणि 5 मुलांचा समावेश आहे. 29 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग एका घरात लागली. त्यानंतर ती फुराहा माध्यमिक शाळा आणि उजामा प्राथमिक शाळेपर्यंत पसरली. अनेक विद्यार्थी शाळेत अडकले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. जखमींची संख्या खूप जास्त असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी नेमकी संख्या नोंदवणे कठीण होत होते.

























































