जी-7 राष्ट्रांचे योगदान आहे तरी किती? जगाच्या अर्थकारणावरून पुतिन यांनी लगावला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाच्या अर्थकारणातील ‘ब्रिक्स’च्या योगदानाची आकडेवारी देत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जी-7 राष्ट्रांना टोला हाणला. ‘‘जगाच्या अर्थकारणात तथाकथित जी-7 राष्ट्रांचे योगदान आहे तरी किती? हे देश स्वतःला जी-7 का म्हणवून घेतात तेच कळत नाही,’’ अशी टीका पुतीन यांनी केली.

ब्रिक्स परिषदेच्या उद्योग मंचावरून ते बोलत होते. ‘‘जगाचे अर्थकारण बदलले आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. जगाच्या जीडीपीत ब्रिक्सचा हिस्सा 40 टक्क्याहून जास्त आहे, तर ‘जी-7’मधील इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीचे योगदान फक्त 29 टक्के आहे,’’ याकडे पुतीन यांनी लक्ष वेधले.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आर्थिक ताकद आणि तंत्रज्ञानाचा वापर राजकीय जोरजबरस्तीसाठी केला जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेचे नाव न घेता केले.

मोदींनी मांडली त्रिसूत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्रिसूत्री मांडली. व्यापारातील प्रमुख 10 अडथळे दूर करणे, दरवर्षी 100 स्टार्टअप्सना पाठिंबा देणे आणि दरवर्षी 1,000 नवीन व्यावसायिक भागीदारी निर्माण करणे, हे तीन मुद्दे त्यांनी मांडले.