फक्त स्वयंपाकातच नाही, तर घरातील ‘या’ कामांमध्येही करा लवंगेचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात असणारी लवंग केवळ चहा, भाजी किंवा पुलावची चव वाढवण्यासाठीच वापरली जात नाही, तर तिचे इतरही अनेक फायदे आहेत. लवंगचा वापर केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित न ठेवता घरातील इतर दैनंदिन कामांमध्ये कसा करता येईल, याचे काही सोपे आणि अनोखे हॅक्स जाणुन घ्या.

  • लवंगाचा सुगंध घराचा कोपरा न कोपरा फ्रेश ठेवण्यास मदत करतो. यासाठी थोडे पाणी घेऊन त्यात लवंग उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यावर ते घर साफ करताना वापरा. त्यामुळे घरात दीर्घकाळ लवंगाचा हलका आणि ताजोतवाना सुगंध राहतो.
  • लवंगाचा तीव्र वास अनेक प्रकारच्या कीटक-माशांना अजिबात आवडत नाही. कपड्याच्या छोट्या पोटलीत काही लवंगा बांधून किचनमधील कपाटे, खिडक्या किंवा जिथे कीटक येतात तिथे ठेवा. यामुळे कीटक दूर राहण्यास मदत होते.
  • लवंगाचा वापर घरगुती रूम फ्रेशनर म्हणून करता येतो. लवंग पाण्यात उकळून ते सुगंधी पाणी खोलीत ठेवल्यावर त्याचा छान सुवास येतो. याशिवाय संत्री किंवा लिंबाच्या सालीसोबत लवंग ठेवल्यानेही घरात उत्तम सुवास पसरतो.
  • कचऱ्याच्या डब्यातून किंवा त्याच्या आसपास येणाऱ्या दुर्गंधीने त्रस्त असाल, तर सुती कपड्याच्या पोटलीत काही लवंगा भरून डब्याजवळ ठेवा. लवंगेचा तीव्र सुवास दुर्गंधी दाबण्यास मदत करतो. ही पोटली वेळोवेळी बदलत राहा.