
बॉलीवूडचं स्टार जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. दीपिका पदुकोणने दुसऱ्यांदा एका मुलीला जन्म दिला आहे. याबद्दल रणविर सिंगने पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपिका आणि रणवीरने इंस्टाग्रामवर बाळाच्या पायाचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर ‘वेलकम बेबी गर्ल’ असे लिहिले आहे. या फोटोमध्ये जन्म तारीखही दिली आहे. या फोटोनुसार, दीपिकाने 19 सप्टेंबर रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. या पोस्टवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दीपिका आणि रणवीर यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या पहिली मुलगी दुआचे स्वागत केले होते. आता दोन वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबात दुसऱ्या चिमुकलीचे आगमन झाले असून, दीपवीरच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.



























































