अरे व्वा! 85 व्या वर्षी आजोबा एमए पास, आता पीएचडी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण घ्यायला वयाची अडचण येत नाही. मनात शिक्षणाची आवड असेल तर कोणतीच गोष्ट कठीण नाही याचा प्रत्यय हरयाणातील सिरसा येथे आला. 85 व्या वर्षी लालचंद गोदारा यांनी एमएची परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. आता त्यांना डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी पीएडीची तयारी सुरू केली आहे.

सिरसा गावात राहणारे लालचंद गोदारा यांचे वय 85 वर्षे आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या कामगिरीचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे. लालचंद यांची नात नव्या गोदारा हिने सांगितले की, मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिच्या मैत्रिणी आपापसात प्रत्येकाचे आजोबा खूप शिकलेले आहेत यावरून चर्चा करायच्या आणि टोमणे मारायच्या.

आजोबांच्या कमी शिक्षणामुळे तिला लाज वाटायला लागली होती. तिने आजोबांना तसे बोलून दाखवले. नातीचे बोलणे जिव्हारी लागल्याने आजोबांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र अभ्यास करून आजोबांनी पहिल्याच प्रयत्नात एमएची परीक्षा पास केली. आजोबांनी कोणतीही कोचिंग लावले नव्हते. आजोबा पास झाल्याने नातीला आनंद झाला आहे.

आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर 1961-62 मध्ये ते सैन्यात भरती झाले. सैन्यात त्यांनी 1962, 1965, 1971 च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला, परंतु दहावी पास नसल्यामुळे त्यांना सैन्यात पदोन्नती मिळू शकली नव्हती.