धूम्रपानाचा खर्च वाढला, सिगारेट महागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धूम्रपान करणाऱ्यांना आता सिगारेटसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. इम्पीरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच आयटीसीने आपल्या लोकप्रिय ब्रँड गोल्ड फ्लेक प्रीमियम सिगारेटच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पाकीट उघडताच सिगारेटचे झुरके आता ग्राहकांच्या खिशाला चटका देणार आहेत.

गोल्ड फ्लेकने सिगारेटच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. मागील तीन महिन्यांत सिगारेटच्या पॅकच्या किमतीत 17 टक्के वाढ झाली आहे. क्लासिक कनेक्टच्या 20 सिगारेटच्या पॅकची किंमत 390 रुपयांवरून 428 रुपये झाली आहे. गोल्ड फ्लेक सुपरस्टारच्या 10 सिगारेटच्या पॅकची किंमत 79 वरून 89 रुपये झाली आहे. 20 सिगारेटच्या पॅकची किंमत 20 टक्क्यांनी वाढून 300 रुपयांवरून 390 रुपये झाली आहे. मागील 9 महिन्यांत यात जवळपास 42.66 टक्के वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून सिगारेटवर 40 टक्के जीएसटी दर लागू करण्यात आला आहे.