रोशनी नाडर देशातील सर्वात श्रीमंत महिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. वर्षभरात 27 नवीन अब्जाधीशांची भर पडली असून एकूण संख्या आता 391 झाली आहे. यंदाच्या लिस्टमध्ये महिलांचाही सहभाग वाढला असून रोशनी नाडर या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.

‘एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026’ नुसार एकूण 131 महिलांचा समावेश आहे, जो गेल्या वर्षीच्या 100 महिलांच्या तुलनेत अधिक आहे. गौतम अदाणी आणि त्यांचे कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अदाणी कुटुंबाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला मागे टाकले आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दहा टक्के घट झाली असून 8.63 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

यादीत आर्सेलरमित्तलचे एलएन मित्तल आणि त्यांचे कुटुंब आठ पायऱ्या वर चढून तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. या वर्षीच्या ‘रिच लिस्ट’मध्ये एक हजार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या 1,810 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.