
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चा नारा देताना थुंकणाऱ्यांना रोखणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर टॅक्सीचालकांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत ‘थुको मत’चा संदेश पोहोचवला जाणार आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग मुंबई मध्य आणि रोटरी क्लब यांनी जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. ताडदेव आरटीओमध्ये या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निखिल साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. टॅक्सीचालकांनी स्वतः कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, आपले मुंबई शहर स्वच्छ ठेवावे, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
























































