काहीतरी खास शिजतंय!

जगातील खवय्यांना आवडीने  खायला घालणाऱ्या जयंती कठाळे आणि आपल्या मसालेदार नॉनव्हेज डिशसाठी प्रसिद्ध असलेल्या नूपुर बत्तीन या दोन सुगरणींची भेट झाली. नुकताच सोशल मीडियावर त्यांनी आपला एक फोटो शेअर केला. दोघींचा एकत्र फोटो पाहून  खवय्यांमध्ये सुगंध पसरलाय… नक्कीच काहीतरी खास शिजतंय!

जयंती या ‘पूर्णब्रह्म’च्या व्यवस्थापकीय संचालिका असून हा मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रकल्प आहे. जगभरात मराठी खाद्य पदार्थांची गुणवत्तापूर्ण उपाहारगृहे उभारणे आणि मराठी खाद्य संस्कृती दूरवर पोहोचवण्याचे कार्य करतात. नूपुर बत्तीन   निर्मात्या आहेत. त्या एक उत्तम शेफसुद्धा आहेत. ‘नूपुर किचन’च्या माध्यमातून लोकांना चविष्ट, चमचमीत आणि रुचकर जेवण खाऊ घालत त्यांनी आपला स्वतःचा असा खवय्या  वर्ग तयार केला आहे. आता या दोन सुगरणी एकत्र येऊन नक्की कशाचा बेत आखत आहेत, याबद्दल उत्सुकता  आहे.