सेक्सच्या बहाण्याने अनेकांचे गुप्तांग कापणाऱ्या बिजली बाईला अटक

629

सामन ऑनलाईन। नवी दिल्ली

रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना सेक्सच्या बहाण्याने एकांतात नेऊन त्यांचे गुप्तांग कापणाऱ्या एका तृतीयपंथीयाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बिजली बाई असे त्या तृतीयपंथीयाचे नाव असून ती तृतीयपंथीयाची संख्या वाढविण्यासाठी पुरुषांचे लिंग कापून टाकायची. बिजलीवर चार पुरुषांचे अपहरण व त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतीलस जहांगीरपुरी भागातील एका तरुणाला काही दिवसांपूर्वी बिजली बाईने तिच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर सेक्स करायच्या बहाण्याने बिजली त्याला एकांतात घेऊन गेली मात्र तिथे गेल्यावर तिने त्याचे लिंगच कापून टाकले. त्याच अवस्थेत टाकून बिजली तेथून फरार झाली. त्या तरुणाला काही स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. यााप्रकरणी तरुणाने बिजलीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला अटक केली. बिजलीची चौकशी केली असता तिने याआधीही काही तरुणांचे गुप्तांग कापल्याचे मान्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिजली विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारचे काही रॅकेटच बिजली चालवत होती का, तिच्यासोबत आणखी काही तृतीयपंथी सामिल होते काा याचा पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या