
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे शिवसेनेतर्फे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नागपूर-तुळजापूर महामार्गावरील दत्तरामपूर येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटानी पुरता मेटकुटीस आला आहे. अशातच पिकांना भाव नाही. उत्पन्नापेक्षा लागावाडीचा खर्च जास्त आहे. या कारणास्तव कापसाला दहा हजार रुपये हमी भाव द्या,सोयाबिनला सात हजार रुपये हमीभाव दया, अशा विविध शेतकर्यांच्या न्याय मागण्यासाठी आणि झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हातील लोकप्रतिनिधी विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मूख्यमंत्री आले असता जिल्हातील लोकप्रतिनिधींनी शेतकरी समस्यांसंबधीत एकही प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले नाही, असा आरोप करीत संतप्त शिवसैनिकांनी आणि शेतकर्यांनी लोकप्रतिनिधी विरोधात घोषणा दिल्यात. शेतकर्याच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनात शिवसैनिकांनी यवतमाळ जिल्हातील लोकप्रतिनिधींचे फलक हाती घेत आंदोलन केले. त्यात पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी,आमदार मदन येरावार,आमदार डॉ. संदीप धूर्वे,आमदार इंद्रनिल नाईक,आमदार प्रा.अशोक उईके,विधान परिषदचे आमदार निलय नाईक या यवतमाळ जिल्हातील लोकप्रतिनीधींच्या फोटो फलकावर आभार असे लिहिले होते. शेतकरी हिताच्या न केलेल्या कामाबद्दल त्याचे आभार मानले आणि अनोखा पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी या लोक प्रतिनिधिच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
रास्तारोको आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमूख प्रविण शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमूख प्रविण शिंदे,कॅप्टन प्रशांत सुळवे,आर्णी तालूका प्रमूख उज्वल मोरे,लक्ष्मण पठाडे, पकंज ,गणेश बोक्से,यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थीतीत होते,रास्तारोको आंदोलना वेळी ठाणेदार केशव ठाकरे यांनी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
























































