प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे अडकली लग्नबंधनात

अभिज्ञाने लग्नात लॅवेंडर रंगाची नव्वारी नेसली असून तिचा हा हटके लूक फारच जबरदस्त दिसत आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही तिचा बॉयफ्रेंड मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो अभिज्ञाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.

अभिज्ञाने लग्नात लॅवेंडर रंगाची नव्वारी नेसली असून तिचा हा हटके लूक फारच जबरदस्त दिसत आहे. अभिज्ञा स्वत: डिझायनर असल्याने तिचा लग्नातील लूक कसा असणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. मेहूलने देखील अभिज्ञाला मॅचिंग लॅवेंडर रंगाचीच शेरवाणी घातली होती.

मेहुल हा मूळचा मुंबईचा आहे. अभिज्ञा व मेहूलचा ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा झाला होता. त्यानंतर या दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु झाली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिज्ञा केळवणाचे फोटो देखील शेअर करत होती.

आपली प्रतिक्रिया द्या