
सामना ऑनलाईन, पुणे
वैयक्तिक प्रकारात हिंदुस्थानचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू असलेला माजी नेमबाज अभिनव बिंद्रा याने पुण्यात ट्रेनिंग परफॉर्मनन्स सेंटरची स्थापना केली आहे.
अभिनव बिंद्रा फाऊंडेशनच्या अंतर्गत बंगळुरूनंतर पुण्यात दुसरे सेंटर सुरू करण्यात आले आहे. ढोले-पाटील रस्त्यावर असलेल्या या सेंटरमध्ये स्पोर्टस् सायन्स, फिजिओथेरपी आणि रिहॅबिलेशन याबाबत खेळाडूंना मार्गदर्शन केले जाणार आहे. अभिनवने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. ‘हिंदुस्थानी खेळाडूंना जागतिक स्तरावर उच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे,’ असे अभिनवने सांगितले. या सेंटरमध्ये खेळाडूंसाठी स्पोर्टस् सायन्स, रिहॅबिलेशन, फिजिओथेरपी याबरोबरच स्कॉलरशिप कार्यक्रम राबिविण्यात येणार आहे.




























































