
गंभीर गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. हनुमंत सहादु साबळे (वय 38, रा. कुसगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फरारी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी खूनाचा प्रयत्नातील फरार आरोपी हनुमंत साबळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे . ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, प्रकाश वाघमारे, सुनील वाणी यांनी केली.



























































