वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

1748

औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर राजशेखर शिवपुत्र कलशेट्टी यांनी सांगितलेली 10 हजार रुपये लाचेची रक्कम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंदनबाला बबन एखंडे यांनी स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले, परंतु आरोग्याच्या कारणामुळे त्यांना केवळ नोटीस देऊन सोडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील मौजे उंबडगा येथील सरपंचांनी दिलेल्या तक्रारी अर्जात कार्यवाही न करण्याच्या कारणासाठी वैद्यकीय अधिकारी राजशेखर शिवपुत्र कलशेट्टी यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड यांती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम कलशेट्टी यांच्या वतीने आरोग्य सेविका श्रीमती चंदन मला बघून एखंडे यांनी स्वीकारली. रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले, मात्र दोघांच्याही आरोग्याच्या कारणामुळे त्यांना केवळ नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार दराडे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या