विक्रोळी येथील अपघातात प्रवासी महिलेचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला भरधाव टॅक्सीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये प्रवासी महिला ठार झाली. तंजीला शेख (३६) असे मृत महिलेचे नाव असून हा अपघात पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी येथे घडला. तंजीला शेख यांनी ऍपवरून टॅक्सी बुक केली. त्यानुसार टॅक्सीचालक इंद्रजीतसिंग गुरुदयालसिंग हा तंजीला यांना घेऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळीच्या दिशेने निघाला. कन्नमवार नगरजवळ इंद्रजीतसिंग याचे टॅक्सीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याकडेला असलेल्या डंपरला धडकली. टॅक्सी भरधाव असल्याने या अपघातमध्ये तंजीला आणि इंद्रजीतसिंग दोघेही गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वी तंजीला यांचा मृत्यू झाला. तर चालक इंद्रजीतसिंग याच्यावर उपचार सुरू असल्याचे विक्रोळी पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या