ओव्हरटेकच्या प्रयत्नात खानू येथे अपघात, 9 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई – गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील पालीजवळील खानू येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला.

मुंबईतील भांडूप येथील पांडूरंग नारायण गवस हे आपली तवेरा गाडी क्र. एम एच 04 एफ 0405 ही घेऊन मुंबईहून कणकवलीकडे चालले होते. त्याचवेळी वेलीवाडी येथील जितेंद्र जयराम सपकाळ हे आपली बोलेरो पिकअप गाडी क्र. एम एच 08 डब्ल्यू 3918 ही घेऊन गोव्याहून मुंबईकडे चालले होते. ते पुढे जात असलेल्या मॅझिको गाडी क्र. एम एच 06 बीजी 1944 या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बोलेरोची समोरुन येणार्‍या तवेराशी जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले. तिसरी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खोलगट भागात जाऊन थांबली होती.

तवेरा गाडीतील जखमी पुढीलप्रमाणे आहेत. लहू श्रीधर माने, वय 42, रा़मालाड, पूर्व मुंबई, विनायक मंगे परब, वय 36, प्रभाकर सोमा पाताडे, वय 60, हेमंत परब, वय 40, विजय चंद्रकांत गायकवाड, वय 31, तवेरा कार चालक पांडूरंग नारायण गवस, वय 40, सर्व राहणार भांडूप, मुंबई. बोलेरो पिकअपमधील जखमी पुढीलप्रमाणे आहेत. चालक जितेंद्र सकपाळ, वय 33, रा़तेलीवाडी, लांजा, नबिसाब हुसनी चिक्काळी, वय 40, मैनुदि्‌दन सैफन चिक्काळी, वय 28, दोघे रा़मुजावरवाडी, लांजा़ अपघातात दोन्ही गाड्यांच्या र्दनी भागाचा चक्काचूर होऊन नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना स्थानिक लोकांनी तातडीने गाड्यांमधून बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका व महाराष्ट्र शासनाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या त्यातून सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.