
जबरी चोरीच्या तीन गुन्ह्यात पाच वर्षांपासून फरारी असलेल्या सराईताला कोंढवा पोलिसांनी सोलापूरमधील म्हाडा येथून अटक केली आहे. त्याठिकाणी तो शेतात रोजंदारी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश धनाजी शिंदे (रा. सुंदरनगर, मांगडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
विविध गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपींचा शोध कोंढवा पोलिसांकडून घेण्यात येत होता. त्यावेळी जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षांपासून फरार असलेल्या सराईताची माहिती पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व राहुल रासगे यांना मिळाली. तो उदरगाव (ता. म्हाडा) परिसरात शेतात मजुरीचे काम करित असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विंक्रात देशमुख, एसीपी पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे यांनी केली.
शेतात रोजंदारीवर करीत होता काम
आरोपी हा शेतात काम करत तेथील घरात राहत असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेत कोंढवा पोलिसांनी त्याला अटक केली. यापुर्वी त्याच्याविरुध्द भारती विद्यापीठ, वाकड , कोंढवा राजगड पोलीस ठाण्यातंर्गत जबरी चोरी, दरोडयाचा प्रयत्न, खून, दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.





























































