घरफोडी करून आठ वर्षांपासून फरारी असलेल्या अटक, गुन्हे शाखेच्या युनिट चारची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले गोदाम फोडून चोरी करीत तब्बल आठ वर्षांपासून फरार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केले. दयानंद झा (रा. चिखली पिंपरी, मूळ- बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गोदामात चोरी केल्यानंतर सराईत दयानंद झा मूळगांवी बिहार येथे पळून गेला होता. दरम्यान, आठ वर्षांपुर्वी गोदामात चोरी करणारा पिंपरीतील चिखली परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली.

त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चिखली परिसरात आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी तो पिंपळे सौदागर मधील कृष्णा चौकात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून दयानंद झा याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शोभा क्षिरसागर, पोलीस उप निरीक्षक जयदिप पाटील, राजस शेख, दिपक भुजबळ, प्रविण भालचिम, प्रविण कराळे, शितल शिंदे, महेंद्र पवार, स्वप्निल कांबळे यांनी केली.