हिंदू एक नंबर ढोंगी, गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हिंदूंविषयी बेताल विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हिंदू एक नंबर ढोंगी आहेत. हे लोक ‘जय गौ माता’ बोलतात; मात्र जेव्हा गाय दूध देणे बंद करते तेव्हा तिला रस्त्यावर सोडतात, असे वादग्रस्त विधान देवव्रत यांनी बुधवारी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियासह समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. देवव्रत हे बुधवारी नर्मदा जिह्यातील पोईचा गावात सेंद्रीय शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते.