
दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरूद्ध एमपीडीए अॅक्टनुसार एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. प्रदीप उर्फ पद्या राम अडागळे (27, रा. कॅम्प) असे कारवाई केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध 6 गुन्हे दाखल आहेत.
लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत प्रदीप अडागळे याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये हत्यारे बाळगून गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या कृत्यामुळे सामाजिक सुरक्षिततेला बाधा निर्माण झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी त्याच्याविरूद्ध एमपीडीनुसार कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार सराईत अडागळेविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.


























































