
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सगळ्यांनाच फटका बसला आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक सरकारी आणि खासगी कर्मचाऱयांना ‘वर्क फ्रॉम होम’ अंतर्गत काम करावे लागत आहे. अगदी बॉलीवूड सेलिब्रेटींचेदेखील याला अपवाद नाहीत. अभिनेत्री दिया मिर्झा ही सुद्धा सध्या वर्क फ्रॉम होम करतेय. तिनेच इन्स्टा स्टोरीवर एक सेल्फी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. फ्लोरल ड्रेस आणि कमी मेकअपमधला तिचा लूक सेल्फीमध्ये दिसतोय. या फोटोच्या वरच्या बाजूला तिने ‘वर्क फ्रॉम होम’ असे लिहिले आहे. मात्र दिया नक्की कोणत्या प्रोजेक्टवर काम करतेय हे कळू शकलेले नाही. फेब्रुवारी महिन्यात दियाने वैभव रेखी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काही दिवसांतच तिने आपण गरोदर असल्याची गुड न्यूज सोशल मीडियावरून शेअर केली होती.





























































