अभिनेता सुरिया शिवकुमारच्या चेन्नई सिंगम्स टीमच्या लोगोचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील (आयएसपीएल) एक प्रमुख फ्रँचायझी असलेल्या चेन्नई सिंगम्सने त्यांच्या उद्घाटन आवृत्तीसाठीच्या लोगोचे अनावरण केले. रूट मोबाइल लिमिटेडचे ​​प्रवर्तक (प्रमोटर्स) राजदीपकुमार गुप्ता, संदिपकुमार गुप्ता आणि अभिनेता सूर्या शिवकुमार हे चेन्नई स्थित फ्रँचायझी असलेल्या चेन्नई सिंगम्सचे सह-मालक आहेत. गर्जना करणारा सिंह असलेला लोगो चेन्नईचे महान सामर्थ्य आणि शौर्य दर्शवितो. याव्यतिरिक्त, लोगोमध्ये हायलाइट केलेला पिवळा रंग चेन्नईचे तेज दर्शवितो.

चेन्नई सिंगम्सचे सह-मालक राजदीपकुमार गुप्ता म्हणाले की, “मी आणि संदिप दोघेही उद्योजक असण्यासोबतच खेळाविषयी खूप पॅशनेट आहोत. एमसीएमधील आमच्या अनेक क्लबच्या मालकीमध्ये हेच दिसून येते ज्यांनी सुधीर नाईक, झहीर खान, वसीम जाफर, राजेश पवार, राजू सुतार, नीलेश कुलकर्णी यांसारखे प्रतिभावान खेळाडू घडवले. याशिवाय उत्तर मुंबई पँथर्सची आमची मालकी आहे जी मुंबई टी- ट्वेन्टी प्रीमियर लीग आणि मुंबईतील सरस्वती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळतात जे चांगल्या क्रीडा सुविधा पुरवतात. याव्यतिरिक्त, आम्ही महिला क्रिकेटकडेही लक्ष केंद्रित करत आहोत. सध्या आम्ही नॅशनल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक संघ स्थापन केला आहे ज्यातील 5 महिला आणि तितकेच पुरुष खेळाडू मुंबई संघाचा भाग आहेत,” असे ते पुढे म्हणाले.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) ही भारतातील पहिली टी-10 (प्रत्येकी 10 षटके) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असून 6 ते 15 मार्च 2024 या कालावधीत मुंबईत खेळली जाणार आहे. टेनिस क्रिकेटचा चित्तथरारक अनुभव करून देण्यास वचनबद्ध असलेल्या या स्पर्धेत हैदराबाद, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर या सह फ्रँचायझी संघांचा समावेश असलेल्या टीमचे 19 सामने होतील.