
अभिनेत्री हेमांगी कवी ही बऱ्याचदा बोल्ड मुद्द्यांवर तिचे मत बिनधास्तपणे मांडत असते. त्यावरून सोशल मीडियावर अनेकदा तिला ट्रोलही केलं गेलंय मात्र हेमांगी त्याची पर्वा न करता तिची मतं मांडत असते. हेमांगीने नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये तिच्या आई वडिलांच्या प्रायव्हसीबाबत वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
”जवळपास 93-94 काळातली गोष्ट. टायटॅनिक व दयावान यासारखे चित्रपट मी माझ्या कुटुंबासोबत बसून बघायचे. कधीही इंटिमेट सिन लागला की चॅनेल बदला, रिमोट शोधा असं काही व्हायचं नाही. तेवढा मोकळेपणा आमच्या घरात होता. हे आता पाहायचं नाही, हे वाईट आहे, असं माझ्या आई वडिलांनी कधीच केलं नाही. त्यामुळे मला तेव्हा ते सर्व नॉर्मल वाटायचं.” असे हेमांगी सांगते.
या पॉडकास्टमध्ये तिने पालकांच्या प्रायव्हसीबद्दलही बोल्ड वक्तव्य केलं आहे. ”त्यावेळी सर्वजण वन रुम किचन अशा घरात राहायचे. आई बाबांची प्रायव्हसी वैगरे सर्व आम्ही पाहिलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ते पाहिलं तेव्हा ताईला विचारलेलं की आई बाबा नेमकं काय करत होते? तेव्हा तिने माझी समजूत काढली. हे सर्व असंच असतं, या गोष्टींमुळेच आपण जन्माला आलेलो आहोत. आपण सर्वांनी या गोष्टी पाहिलेल्या असतात. त्याच्यामुळेच आपला जन्मझाला, आपण या जगात आलो याची समज यायला हवी’, असं बोल्ड वक्तव्य हेमांगीने या पॉडकास्टमध्ये केलं आहे.


























































