प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर छापेमारीत आढळल्या अडीच लाख पॉर्न सीडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध मीरा टॉवरमधील सी विंगमध्ये असणाऱ्या फ्लॅट नंबर 502 वर ओशिवरा पोलिसांनी छापेमारी केली. 9 जानेवारी 2014 ला पोलिसांच्या पथकाने अचानक केलेल्या या छापेमारीमुळे खळबळ उडाली होती. छापेमारीवेळी या फ्लॅटमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेी मिस्टी मुखर्जी एका खोलीमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या परिस्थितीमध्ये होती. याच वेळी पोलिसांना येथे तब्बल अडीच लाख पॉर्न सीडी देखील आढळून आल्या होत्या.

ओशिवरा पोलिसांनी फ्लॅटमधून लॅपटॉप आणि अन्य काही सामानही जप्त केले होते. त्यावेळी अभिनेत्री मिस्टी मुखर्जी हिच्यावर फ्लॅटमध्ये देहविक्रीय व्यापार करत असल्याचा आरोप झाला होता. तसेच जेथून जप्त करण्यात आलेल्या पॉर्न सीडी दक्षिण हिंदुस्थानातून खरेदी करण्यात आल्याचे बोलले जात होते आणि याची डुप्लिकेट कॉपी बनवून मुंबई, ठाणे आणि परिसरात विकले जात होते. हा संपूर्ण धंदा अभिनेत्रीच्या फ्लॅटमधून चालत होता असाही आरोप करण्यात आला होता. त्यावेळी तिने अनेक बनावही रचले होते. परंतु पोलिसांनी अभिनेत्री आणि तिच्या भावावर व वडिलांवर कलम 292, 66 (अ), 67 (अ) आणि 67 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केले.

कोण आहे मिस्टी मुखर्जी?
मिस्टी मुखर्जी ही एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री असून तिने बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केले आहे. केके मेननच्या लाईफ की तो लग गई, मै कृष्णा हू, कांची या चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिकेत होती. मिस्टी मुखर्जीचा बॉयफ्रेंड राकेश कटारिया दिल्लीतील रहिवासी असून तो व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. ओशिवराच्या ज्या अपार्टमेंटमध्ये मिस्टी राहात होती तेथे जवळपास 70 आयएएस आणि आयपीएस अधिकारीही राहात होते.