‘शिक्षण प्रसारक मंडळी’च्या अध्यक्षपदी अ‍ॅड. नंदू फडके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

शिक्षण प्रसारक मंडळी या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सदानंद ऊर्फ नंदू फडके यांची, तर उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पटवर्धन, बांधकाम व्यावसायिक गजेंद्र पवार, उद्योजक अनिलकुमार रुईया आणि पवन पोदार यांची निवड करण्यात आली.

शि. प्र. मंडळींच्या आज झालेल्या सभेत या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याची माहिती नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन यांनी आज दिली. दिवंगत अध्यक्ष न्या. वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या निधनामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. त्या जागी अ‍ॅड. फडके यांची निवड करण्यात आली. फडके हे महाराष्ट्र अ‍ॅड. गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिले आहेत; तसेच पतित पावन संघटनेचे ते संस्थापक सदस्य आहेत. ४ वर्षे पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेत मागील आठ वर्षांच्या प्रलंबित वैधानिक लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देण्यात आली. या अहवालाच्या पुढील कामकाजासाठी मॅनेजमेंट कमिटी नेमण्यात आली असल्याचे नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन यांनी सांगितले.