गैरकृत्याचा प्रकार समजल्यानंतरही कारवाईस टाळाटाळ! बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिराची शिक्षण संचालकांकडून झाडाझडती

 

शालेय शिक्षण विभागाने बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेची आज अखेर झाडाझडती घेतली. प्राथमिक शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ही ऑनलाईन बैठक झाली. शाळेमध्ये झालेली घटना व त्यावर क्षेत्रिय अधिकाऱयांचे अभिप्राय विचारात घेता शाळेच्या कामकाजामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. गैरपृत्याचा प्रकार समजल्यानंतरही शाळा प्रशासनाकडून नराधम सफाई कामगारावर कारवाईस टाळाटाळ केल्याचा ठपका शाळेवर ठेवण्यात आला आहे.

शाळा प्रशासनाने सदर सफाई कामगारविरोधी तातडीने गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना तसे केले नाही. ही बाब अतिशय गंभीर व अक्षम्य हलगर्जीपणाची असल्याचे निरीक्षण या बैठकीत नोंदविण्यात आले आहे. याशिवाय शाळा व्यवस्थापनाकडून पीडित मुलीच्या पालकांना सहाय्य करण्याची भूमिका घेणे आवश्यक असताना पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून शाळेने असंवेदशीलता दाखवल्याचेही म्हटले आहे.

आदर्श विद्यामंदिरविरोधात शिक्षण विभागाची निरीक्षणे

– राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलीच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी शाळेत सखी सावित्री समिती नेमलेली नाही.

– सदर शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद आहेत. n शाळेमध्ये लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला कर्मचाऱयांची नियुक्ती करणे आवश्यक असतांनादेखील अशा प्रकारची कार्यवाही व्यवस्थापनाने केली नाही.

– सदर प्रकरण शाळा व्यवस्थापनाकडून गंभीरतेने न हाताळल्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली.

– या प्रकरणात शाळेची असंवेदशीलता व कर्तव्यात दाखवेला अक्षम्य हलगर्जीपणा यामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि शासनाच्या प्रचलित शासन नियम धोरणाचा भंग झाला आहे.