
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार असून, त्यांच्या स्वागताचे बॅनर्स शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. कुडाळ शिवसेना शाखेजवळ आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे मोठे होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जिथे निष्ठा जिवंत असते, तिथे अस्मिता जिवंत असते!, जिथे निष्ठा जिवंत असते, तिथे स्वाभिमान जिवंत असतो!, आणि जिथे निष्ठा जिवंत असते, तिथेच राष्ट्र उभी राहतात! निष्ठा ही सदैव चिरंतन असते !! असा संदेश या होर्डिंग्जवर लिहिण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरे कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.






























































