
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदुस्थानचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवर करण्यात आलेल्या निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. प्रशासकिय समितीने गुरुवारी हा निर्णय घेतला. निलंबन रद्द करण्यात आले असले तरी प्रकरणाची चौकशी सुरुच राहणार आहे. दरम्यान, निलंबन रद्द झाल्यामुळे सुरू असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यामध्ये दोघांचेही कमबॅक होण्याची शक्यता आहे.
CoA: The matter and decision has been taken with the concurrence of Amicus Curiae, P.S. Narasimha. In view of the above, the suspension orders dated 11.01.2019 is immediately lifted pending appointment and adjudication of the allegations by the BCCI Ombudsman https://t.co/24ydnzzJn7
— ANI (@ANI) January 24, 2019
करण जोहरच्या शोमध्ये हार्दिक आणि राहुलने महिलांवर वादग्रस्ट वक्तव्य केली होती, तसेच ड्रेसिंग रूममधील अनेक गोष्टीही सार्वजनिक केले होते. यानंतर दोघेही चौफेर टिकेचे धनी ठरले. त्यामुळे बीसीसीआयला कारवाईचा हतोडा उगारावा लागला आणि दोघांवर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
याआधी शनिवारी बीसीसाआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी सीईओकडे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी आग्रह केला होता.

























































