पुणे – अ‍ॅड. उमेश मोरे खून प्रकरणात बार संघटनेच्या सचिवाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून अपहरण करुन खून करण्यात आलेल्या अ‍ॅड. उमेश मोरे यांच्या खून प्रकरणात पुणे बार असोसिएनशच्या सचिवाला आज अटक करण्यात आली. आतापर्यंत दोन वकिलांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. घन:श्याम पोपट दराडे (वय 33)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी अ‍ॅड रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32, रा. संतनगर, अरण्येश्वर), कपिल विलास फलके (वय 34,रा. चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28,रा. साले वडगाव, ता. आष्टी, जि.बीड) यांना अटक करण्यात आली. प्रशांत मोरे यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अ‍ॅड. दराडे यांनी अ‍ॅड. मोरे यांची माहिती आरोपींना पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. साळुंखे यांनी अ‍ॅड. दराडे यांना शनिवारपर्यंत (31 ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.