घटस्फोट हा आयुष्यातील टर्निंग पॉईंट, अनोखे फोटोशूट करून महिलेने दिला संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रीवेडिंग फोटोशूटचं फॅड तरुणाईमध्ये दिसतं. याविषयी तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेलच तसेच डोहाळ जेवणाचे फोटोशूटही हल्ली महिला आगळ्यावेगळ्या पद्धतीने करताना दिसतात, मात्र सध्या सोशल मिडियावर एका तरुणीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोशूटविषयी कुणीही आतापर्यंत कधीच ऐकले नसेल.

या फोटोशूटचे वेगळेपण म्हणजे हे फोटोशूट एका महिलेने चक्क पतीपासून विभक्त झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी केले आहे. याविषयी ती सांगते की, घटस्फोट हा आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असल्याचा संदेश तिने तिच्या या फोटोशूटमधीन दिला आहे. त्यामुळे ही महिला घटस्फोटाचा आनंद व्यक्त करताना या फोटोमध्ये दिसत आहे. तरुणीच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक याला विरोध करत आहेत तर अनेक जण समर्थनही करत आहेत. समर्थक म्हणतात की, वेदनादायक नातेसंबंधातून बाहेर पडणे ही आनंदाची गोष्ट आहे.

घटस्फोट घेतल्यामुळे फोटोशूट करणाऱ्या या महिलेचे नाव शालिनी आहे. लाल रंगाचा ड्रेस परिधान करून ती तिच्या आयुष्यातील या दिवसाचा आनंद साजरा करत आहे. तिने तिच्या आधीच्या पतीसोबत काढलेली छायाचित्रे फाडत असल्याचेही तिच्या या व्हिडियोमध्ये दिसत आहे याशिवाय लग्नाची छायाचित्रेही पायखाली चिरडून आपला संताप व्यक्त केला आहे. महिलेने हातात ‘DIVORCE’ हा शब्द लिहिलेली रिबन घेऊन छायाचित्रांसाठी पोझही दिली.

दुसऱ्या फोटोत शालिनी एका हातात दारूची बाटली आणि दुसऱ्या हातात बोर्ड घेऊन उभी आहे. सोशल मीडियावर अनेकांचे म्हणणे आहे की, शालिनीने हे काम केले आहे जेणेकरून तिने रूढीवादी कल्पना मोडून काढता याव्यात आणि पतीपासून विभक्त होऊनही ती सामान्य जीवन जगू शकेल, असा संदेश देऊ शकेल. शालिनीने हातात घेतलेल्या पाटीवर ‘माझ्याकडे 99 अडचणी आहेत, पण 1 समस्या आहे आणि ती म्हणजे माझा नवरा.’ , असे लिहिले होते.

इतर महिलांना संदेश
शालिनीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एका घटस्फोटित महिलेचा अशा महिलांना संदेश ज्या महिला त्यांच्या आयुष्याशी तडजोड करत आहेत. तुम्हालाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे जेणेकरून तुम्ही विवाहाच्या बंधनातून बाहेर येऊ शकता. आयुष्याशी तडजोड करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. घटस्फोट हे अपयश नसून तो आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे. ‘