
प्रसिद्ध मेन्टॅलिस्ट (माइंड रिडर) केदार परुळेकर यांचा ‘माइंड इट’ हा कार्यक्रम तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी 14 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. नाटयगृहे पुन्हा सुरू झाली आहेत, या आनंदाप्रीत्यर्थ हा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.
लोकांच्या मनातील नावे, चित्र किंवा नंबर ओळखणे, एकाला केलेला स्पर्श दुसऱया व्यक्तीला जाणवणे, या व अशा प्रकारच्या अनेक अद्भुत गोष्टी केदार परुळेकर कार्यक्रमाद्वारे दाखवतात. सारेगमप लिटील चॅम्प्स कार्यक्रमामध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मृण्मयी देशपांडे यांच्या मनातील चित्र व तिचा एटीएम पिन नंबर अचूक ओळखला. एक अचाट प्रयोग करत त्यांनी आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि स्पर्धक मुले यांच्या मनातील विविध गोष्टी ओळखून करून दाखवल्या. हा कार्यक्रम 11 ते 13 नोव्हेंबरला झी मराठी चॅनेलवर बघता येईल.
केदार सांगतात की, ‘हा कार्यक्रम कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. हा कार्यक्रम पूर्णतः आनंददायी आणि धमाल पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनाचे दर्शन घडवित प्रेक्षकांना चकित करणारा एक कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे.
























































