विराट कोहलीला भाररत्न पुरस्कार देण्याची शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार, धडाकेबाज फलंदाज अशी ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहलीला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.  विराट कोहलीचा ५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय क्रीडा  महासंघाने (AIGF) ही मागणी केली आहे.

अखिल भारतीय क्रीडा महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की कोहलीने उत्तमोत्तम खेळी साकारत क्रीडारसिकांचे मन जिंकले आहे. क्रिकेटचा स्तर जगभरात उंचावण्यासाठी कोहलीला भारतरत्न पुरस्कार दिला जाणं महत्वाचं आहे. जर कोहलीला हा पुरस्कार दिला गेला तर तो त्याच्या योग्यतेचा आणि मेहनतीला सन्मान असेल असं महासंघाने म्हटलं आहे. विराट कोहलीने आतातपर्यंत ६२ शतकं ठोकली असून तो सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडेल असं क्रिकेटतज्ज्ञांचं मत आहे. विराट कोहलीला याआधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.