फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाला हवेत जोरदार दणके; 12 प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या टर्ब्युलन्समुळे 12 प्रवासी जखमी झाले आहेत. यात दोन क्रू मेंबर्स आणि दहा प्रवाशांचा समावेश आहे. यात विमानाचेही थोडे नुकसान झाले आहे.

एअर इंडियाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ४ ऑगस्ट रोजी फुकेत ते दिल्ली दरम्यान उड्डाण करणाऱ्या ‘AI379’ या विमानाला क्रूझ मोडमध्ये असताना अचानक टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. यामुळे विमानाची उंची काही क्षणांसाठी अचानक खाली आली. घटनेनंतर विमानाने दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले असून, विमानातील सर्व १३४ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे खाली उतरले आहेत.

विमानातील कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, किरकोळ दुखापत झालेल्या काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.